#8 बालपण कोमेजताना…

बालपण म्हटलं की आपल्या समोर किती सुंदर आणि रम्य असं ते बालपण डोळ्यासमोर येते. बालपणीचा काळ सुखाचा म्हटला आहे तो उगाचच नाही. बालपण म्हटलं की आठवते ती मजा, मस्ती वेगवेगळे खेळ मित्र, मैत्रिणी त्यांच्याबरोबर खेळलेले खेळ, घालवलेले क्षण, मारलेल्या गप्पा, एकमेकांसोबत शेअर केलेली गुपिते, किती वेळा पडलो आणि धडपडलो सुद्धा हात पाय फोडून घेतले, जखमा करून घेतल्या आणि आज त्या जखमांचे व्रण एखादं पदक घेऊन मिरवावे तसे मिरवतो आहोत. आणि अभिमानाने त्या खुणा आठवून आठवून सांगतो कधी, कोठे, केव्हा केव्हा पराक्रम केलेत ते.

Photo by form PxHere

बालपणाच्या भूतकाळातून मन बाहेर पडते आणि आताच्या मुलांच्या वर्तमानाचा विचार करता करता कधीच त्यांच्या भविष्यात जाऊन पोहचत.

आजच्या मुलांच्या बालपणाकडे पाहताना विचार येतो ही मुलं आपलं बालपण जगतील ? आपण बालपणी घेतलेला अनुभव कधी तरी त्यांच्या वाटणीला येईल का? आट्यापाट्या, सूरपारंब्या, लंगडी, लगोरी, आबादुवी, लपाछपी, डोंगरपाणी, आंधळी कोशिंबीर हे कधी खेळ होते हे सांगूनही पटणार नाहीत आजच्या मुलांना.

Photo by form PxHere

आजच्या मुायांचे बालपण केवळ 2 ते 3 वर्षापुरतचं मर्यादित ठरलं आहे. हम दो हमारा एक असे म्हणण्याच्या सध्याचा काळ असल्यामुळे प्रत्येक पालकांना आपल्या मुलाला चांगल, उच्च शिक्षण मिळावं आणि तसेच आम्ही नाही शिकलो इंग्रजी पण आमच्या मुलाला ते यायला हवंच या अपेक्षेने पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा अट्टहास करतात आणि इथूनच बालपण कोमेजायला सुरवात होते.

मग वयाच्या तिसऱ्या वर्षापासून ने आयुष्यभराची त्याची भागदौड व्हायला सुरवात होते. वयाच्या तिसऱ्या वर्षामध्ये आताच ते मूल कुठे आपल्या आई वडिलांना, आजी-आजोबांना, काका काकी,आत्या, मामा – मामी, भावंड, नातेवाईक, शेजारी आपल्या आजूबाजूचा परिसर न्हाहाळायला, ओळखायला लागलेला असतो, स्वतःचं शी-शू करणं, सांगण जमत नाही, स्वतःच्या हाताने व्यवस्थित खाणे जमत नाही तिथे फक्त play group, nursery ला प्रवेश घ्यायचा आहे, म्हणून interview च्या नावाखाली पालक अक्षरसः त्या बालमनाचा पण विचार करत नाहीत. ज्याला आई-पप्पा नीट म्हणता येत नाहीत अशा वयात what’s your name? Address, phone no असं पाठांतर करून घ्यावे लागते. का हा अट्टहास.

Photo by form PxHere

अक्षरसः ही मुलं अर्धवट, झोपेत, अर्धपोटी सकाळी लवकर उठून शाळेत जातात. स्कूल बस फिरत फिरत येत असल्याने, तसेच सर्व मुलांना गोळा करायचे असल्यामुळे काही मुलांकडे तर बस कधी कधी शाळेच्या वेळेच्या आधी एक तास लवकर येते. एक तासभर ही मुलं फक्त बसमधूनच फिरत असताना विचार करा म्हणजे त्या मुलांना सकाळी किती वाजता उठून तयार व्हावे लागत असेल? तीच तऱ्हा संध्याकाळी शाळा सुटल्यावर, एक दीड तास झाला तरी ही मुलं घरी पोचलेली नसतात. सकाळी घाईगडबडी होते. अर्धवट झोपेत असताना आई सारखी ऊठ ऊठ करते, बाबा काहीतरी आमिष दाखवतात. मग ही मुलं कंटाळताच उठतात. नैसर्गिक विधी कधी आटपले तर आटपले नाहीतर तसेच स्वतःच आवरतात आणि बळे बळेच नाश्ता करतात आणि tiffin, bottle, बॅग घेऊन ही स्वारी सर्व लाव्याजम्यासह शाळेत पोहचते डोळ्यावर असलेली अनावर झोपेची पट्टी बाजूला ठेवून मन अभ्यासावर केंद्रित करावे लागते. ती करडी शिस्त, बाहेर-आत येताना शिस्त, सकाळी कधी तो लवकर उठून केलेला डंबा ही मुलं दुपारी थंडगार झाल्यावर खातात, काय मिळतं असतील vitamins, proteins आणि iron & Calcium.
अख्खं बालपण शिस्तीत

लहान असेपर्यंत पालक स्वतः अभ्यासात मदत करतात परंतु जसजसा अभ्यास वाढू लागतो तसा तो पालकांच्या आवाक्याबाहेर जातो आणि सुरू होतात त्या tution च्या वारी शाळेतून घरी आल्यावर कितीही भूक असू दया नाहीतर झोप पालकवर्ग न विसरता एक मिनीटाचा उसंत न देताही tution ला पाठवायला विसरत नाही मग त्याच tution मध्ये शाळेचा homework करून घेतला जातो. रात्री 8,8:30 वाजेपर्यंत म्हणजे सकाळी घर सोडलेल मूल रात्री घरी येतं ते फक्त जेवायला आणि झोपायलाच..

Photo by form PxHere

आणि हे कमी म्हणून की काय पालकवर्ग सध्या मुलाला एखादा तरी छंद असावा म्हणून सुट्टीच्या दिवशी त्याला छंदवर्गाला जोडून देतात अस करून नेमके काय करायचं असतं त्यांना एक दिवस पण आपल मूल आपल्याकडे असावे, या दिवशी त्याने आरामात उठावं, आराम करावा, मनसोक्त टि.व्ही पाहवं, खेळाव, फिरायला जावं असं आपल्या मुलाने करावे ही पालकांचीच इच्छा नसते की काय हा मोठा विचार करण्याच्या विषय आहे?

मान्य आहे. सध्याच्या काळ स्पर्धेचा आहे. आपाल मूल स्पर्धेत टिकलं पाहिजे म्हणून त्याला dancing, singing, badminton, chess, skating असे अद्भूत कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठी मुलांपेक्षा पालकांचाच आटापीटा जास्त चाललेला दिसतो. अरे कोणाला लावायची आहे स्पर्धा आणि कोणाशी.

Photo by form PxHere

आताच्या काळातर आई वडील दोन्ही नोकरीला, भरमसाठ पगाराचे पॅकेज असल्यावर कोण नाकारणार नोकरी हे सगळ सांभाळताना हेळसांड होते ती बालमनाची, सकाळी लवकर जाणारे आई – वडील संध्याकाळी कधी – कधी तर रात्री घरी परततात.
मग अशा वेळेस जास्त पैसा मोजून हा पालक वर्ग मुलांना शाळेत च ठेवण्याची विनंती करतात किंवा care taker किंवा पाळणाघरात ठेवतात, अशा वेळेस मुलं स्वतःच भावविश्व कोणाजवळ मोकळं करणार? आणि मग या मुलांना शाळेतल्या अंकल, आंटी जवळचे वाटतात की जे त्यांची काळजी घेतात. आईपेक्षा ताईचा लळा या मुलांना जा लागतो आणि जसजशी मोठी होतात तेव्हा ते स्वतःच्याच विश्वात हरवून जातात. स्वतःच विश्व निर्माण करतात, मोबाइल हा मित्र बनवतात, मोबाइलवरून मित्रांशी गप्पा मारतात. नवनवीन friends करतात. आईवडिलांपेक्षा मग या मुलांना बाहेरच जग आपले वाटू लागत. पैसा असतो म्हणून आपण त्यांना उच्च शिक्षण देतो आणी अशी ही मुलं नोकरीच्या निमित्ताने परदेशी कायमचे स्थायिक होतात. बालपण कोमेजलेली ही मुलं जेव्हा तारुण्यात प्रवेश करतात तेव्हा भारतात मागे राहिलेल्या आई वडिलांना मग आपलं मूल जवळ हवंस वाटू लागतं वर्षातून किमान एकदातरी भारतात परत यावं अशी आस लावून बसतात. निसर्ग परतफेड करतो म्हणतात ना तसं आपण पैशाच्या मागे लागून आपण लहान मुलांना दूर ठेवतो आपल्यापासून, पाळणाघरात ठेवतो. तसेच भविष्यातही मूलांनी पैशाच्याच माध्यमाने आपल्या आईवडिलांची care taker ठेवून किंवा वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं तर त्यात नवल वाटण्यासारखं काहीच नसाव.

7 thoughts on “#8 बालपण कोमेजताना…”

  1. खूप छान लेख. ऑनलाईन शिक्षण पध्दतीचे फायदे व उणीवा चांगल्या पध्दतीने विषद केल्या.धन्यवाद मॅडम.

    Reply
  2. सध्य स्थितीत अतिशय बारकाईने विचार करून कोमेजले बालपण या विषयावर लेखन केले आहे आणि खरचं पालकांनी मुलांचा कल, आवड, छंद पाहून तसेच त्यांच्या वयाचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे असे सांगण्याचा खूप चांगला प्रयत्न या लेखाद्वारे केलेला आहे. खूप छान लेख लिहिला आहे. असेच वेगवेगळ्या विषयांवर लेखन करण्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा!

    Reply
  3. अतिशय योग्य पद्धतीने लिहिले आहेस. मुलांच्या बालमनाचा विचार न करता ही स्पर्धा आपण पालकांनी च तयार केली आहे. दुसऱ्याची मुले काय करतात, त्यांनी किती मार्क्स मिळवले, त्यांनी कुठला नवीन क्लास लावला या कडे आपले सगळे लक्ष लागून राहिलेले असते. आपले मूल काय करतंय,त्याच्यामध्ये काय गुण, कौशल्य आहे याचा विचार न करता, त्याच्या इच्छेविरुद्ध व आपल्या समाधानासाठी त्याला एखाद्या क्लास मध्ये ढकलले जाणे ही आजची फॅशन झाली आहे.

    Reply

Leave a Comment